Ladki Bahin Yojana e kyc Last Date 2025: ई-केवायसी प्रक्रिया व अंतिम तारीख

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या कल्याणासाठी तसेच आर्थिक हातभार लावण्यासाठी केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना ई केवायसी ची शेवटची तारीख काय आहे.

नोट: योजनेतील सुधारणा किंवा वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्या जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाशी किंवा अधिकृत वेबसाइटवर तपासणे शहाणपण आहे.

लाडकी बहीण योजना ekyc करण्यासाठी

इथे क्लिक करा

ई-केवायसीची अंतिम तारीख

लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया १८ सप्टेंबर २०२५ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार, लाभार्थींनी २ महिन्यांच्या आत, म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. या मुदतीनंतर ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे

📝 ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड: पति व पत्नीचे ( जर लग्न झाले असेल तर पतीचे)

आधार कार्ड: वडील व मुलीचे ( लग्न झाले नसेल तर) आधार लिंक मोबाइल नंबर दोघांचा

https://vericollege.com/ladki-bahin-yojna-e-kyc-last-date/

लाडकी बहिण योजना e-KYC करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
    सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिण योजना पोर्टलवर जा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  2. e-KYC पर्याय निवडा
    मुख्य पृष्ठावर “e-KYC” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. तेथे तुमचा आधार क्रमांक भरातुमचा आधार क्रमांक टाका दिलेला कॅप्चा भरा Send OTP वर क्लिक करा
  4. OTP द्वारे पडताळणी
    आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर OTP येईल
    तो OTP टाकून Submit करा
  5. पात्रता तपासणी
    प्रणाली तपासेल की तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत आहे का असेल तर otp verify होऊन वेबसाईट च्या बाहेर पडेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या लग्न झाले असेल तर पतीचा आधार नंबर टाका पुन्हा captcha code ताका व otp साठी क्लिक करा त्या नंतर otp आला की otp टाकून submit करा त्या नंतर ekyc successfully done म्हणून message येईल
    काही वेळा कुटुंबप्रमुख किंवा पती/वडिलांचा आधार क्रमांक देखील विचारला जाऊ शकतो
  6. घोषणापत्र भरा
    येथे तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागतील :
    कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नाही
    निवृत्तीवेतन घेतले जात नाही
    लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात
  7. प्रक्रिया पूर्ण
    सर्व तपशील भरून Submit केल्यानंतर स्क्रीनवर “तुमची e-KYC प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

📌 लाडकी बहीण योजना पात्रता (Eligibility)

1 सदर योजने साठी महाराष्ट्र राज्यातील महिला असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजना अपात्रता कारणे

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर करण्याचे कारण हे असते की त्यांनी योजनेच्या पात्रता निकषांचे पालन केलेले नाही. अपात्रतेची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. यात जी महिला बसते ती अपात्र आहे.

📢 मदत आणि संपर्क

ई-केवायसी प्रक्रियेत अडचणी आल्यास, खालील पर्यायांचा वापर करा:

अंगणवाडी केंद्र: तुमच्या परिसरातील अंगणवाडी केंद्रात संपर्क साधा.

आपले सरकार सेवा केंद्र: नजीकच्या सेवा केंद्रात जाऊन मदत घ्या.

ई‑केवायसी का करावी लागेल?

चुकीचे / अपात्र लाभार्थी शोधणे, योजनेंतील पारदर्शकता वाढवणे आणि निधी योग्य व्यक्‍तीपर्यंत पोहोचणे या कारणांसाठी ई‑केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे.

ई‑केवायसी प्रक्रिया कशी करावी?

वेबसाइटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) लॉगिन करावे → ई‑केवायसी विभाग निवडावा → आधार क्रमांक, ओटीपी इत्यादी तपशील भरणे → पुष्टी करणे.

ऑफलाइन / सहाय्य केंद्रांद्वारे प्रक्रिया शक्य आहे का?

हो, इंटरनेट नसल्यास CSC, आधार सेवा केंद्रे, महिला व बालविकास विभाग कार्यालये इत्यादी ठिकाणी सहाय्य मिळू शकते. (तपशील पाळावे)

जर ई‑केवायसी वेळेत न झाली तर काय होईल?

त्यानंतर पुढील मासिक मदत (₹1,500) रोखली जाऊ शकते, तोपर्यंत ई‑केवायसी पूर्ण केली नाही

ही प्रक्रिया वार्षिक करावी लागेल का?

हो, GR मध्ये म्हटले आहे की त्या लाभार्थींची ई‑केवायसी दर वर्षी जून महिन्यात करावी लागेल.

Leave a Comment